1 min read

समाधान पाटील यांची नुकतीच छात्र सेना अधिकारी म्हणून नियुक्ती

Loading

समाधान पाटील यांची नुकतीच छात्र सेना अधिकारी म्हणून नियुक्ती

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी विद्यालयाचे समाधान पाटील यांची एनसीसी अधिकारी म्हणून नियुक्ती
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री समाधान पाटील सर यांची नुकतीच छात्र सेना अधिकारी म्हणून नियुक्ती झाली
समाधान पाटील सर यांनी कामठी (नागपूर) येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी मध्ये 8 एप्रिल ते 22 मे 2024 असे 45 दिवसाचे निवासी आर्मी प्रशिक्षण पूर्ण केले व त्यांना एनसीसी मधील थर्ड ऑफिसर ही रँक प्राप्त झाली. सदर राष्ट्रीय स्थरातील प्रशिक्षण शिबिरात देशभरातून 517 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर मार्फत श्री समाधान पाटील यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांची साने गुरुजी विद्यालयात एनसीसी अधिकारी पदासाठी निवड झाली असून त्यांना 49 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल पिनाकी बनिक तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील सचिव श्री संदीप घोरपडे व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *