1 min read

कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात सेमीच्या विद्यार्थ्यानी मारली 10 वी बोर्डाच्या परीक्षेत बाजी!!

Loading

कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात सेमीच्या विद्यार्थ्यानी मारली 10 वी बोर्डाच्या परीक्षेत बाजी!! विद्यार्थ्याच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी झटणारी शाळा म्हणजे शारदा माध्यमिक विद्यालय होय. ह्या शाळेत वर्षभर विविध स्पर्धा, खेळ, शिबीरे,नाटय, विज्ञान प्रयोग, निसर्ग शिबीर सोबत अभ्यासपुरक उपक्रम घेतले जातात. बाहेरील उपक्रमात शाळा हिरहिरीने भाग घेते. ह्या शाळेचा एस. एस. सी. शालांत निकाल 89.47% इतका लागला. शाळेने सेमी इंग्लीश कधीपासून सुरू केल्याने सेमी इंग्लीश चा दरवर्षी निकाल वाढत चाललाय. यंदा शाळेतुन प्रथम येण्याचा मान कांचन राजेश राठोड ह्या विद्यार्थीनीने 93% गुण परीक्षेत घेऊन मिळविला. द्वितीय दोन विद्यार्थी समान टक्क्यांनी आले त्यात पियुष ज्ञानेश्वर महाजन 89.40% व संजोग सुनिल पाटील 89.40% तृतीय क्रमांकाने कोळी प्रिया मधुकर कोळी ही 88% आली. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन अध्यक्ष नानासाहेब महेंद्रलाल कोठारी, उपाध्यक्ष यादव चौधरी, तसेच सर्व संचालक मंडळ,प्रशासकीय अधिकारी जी. टी. टाकभाऊसाहेब तसेच मुख्याध्यापक व समस्त शिक्षक बंधु भगिनींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *