1 min read

दहावी बोर्ड परीक्षेत नोबेल फाउंडेशनचे घवघवीत यश,कृष्णा पवार अमरावती विभागात प्रथम

Loading

दहावी बोर्ड परीक्षेत नोबेल फाउंडेशनचे घवघवीत यश,
कृष्णा पवार अमरावती विभागात प्रथम


कृष्णा पवार अमरावती विभागात प्रथम

जळगाव – नुकताच इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रात विज्ञान व शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य समजली जाणारी नोबेल फाउंडेशन या संस्थेच्या ऑफलाइन तसेच ऑनलाईन कोर्सेसच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादित केले आहे. यात कृष्णा नंदकिशोर पवार याने 99.80% गुण प्राप्त करून अमरावती विभागात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.विशेष म्हणजे कृष्णा पवार हा 2023 मध्ये पार पडलेल्या नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे .त्याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था दौऱ्यासाठी निवड देखील झालेली आहे. याशिवाय अद्वैत निलय अढाऊ याने 96.80% गुण प्राप्त करून मोठे यश संपादित केलेले आहे. तसेच हर्ष आशिष राव याने 96.20% गुण प्राप्त केलेले आहेत.अद्वैत आणि हर्ष हे सन 2022 परीक्षा इस्रो दौऱ्यासाठी निवड झालेले विद्यार्थी असून नोबेल फाउंडेशन येथे ऑनलाइन प्रशिक्षण घेतले आहे. तसेच श्रेयस प्रवीण चौधरी याने 92.60 टक्के गुण प्राप्त करून जळगाव येथील प्रगती विद्यामंदिर येथे द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. तर श्रेया मनोज सरोदे हिने 90.20% गुण प्राप्त करून मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यासह विशाल पाटील(90.00%), प्राची साळुंखे 89.00%),कृष्णा बडगुजर(88.00), भावेश पाटील(85%), जयेश विसपुते (83%) यांनी देखील उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच भाग्यश्री संग्रामसिंग पाटील ही संस्कृत विषयात 99 गुणांसह प. न.लुंकड कन्या शाळेत प्रथम आलेली आहे. सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील, जयश्री पाटील, संचालक राज्यकर निरीक्षक राहुल पाटील, राजेंद्र पाटील, आदिवासी उपायुक्त कपिल पवार, सहा.पोलीस उपनिरीक्षक लीलाधर पाटील आदींनी अभिनंदन केले. या निकालाबद्दल प्रतिक्रिया देताना जयदीप पाटील म्हणाले की ,”विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन तसेच वेळोवेळी समुपदेशन केल्यास विद्यार्थी चांगले यश संपादित करू शकतात हे या निकालामुळे दिसून येते. नोबेल फाउंडेशन तर्फे भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मोठी चळवळ उभारण्याचा मानस आहे”. सर्व यशवंत विद्यार्थी पालक व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

दहावीतील गुणवंत विद्यार्थी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *