1 min read

आज पहाटे साक्री रोडवर मॉर्निंग वॉक वाले आले आणि गतिरोधकाचे पांढरे पट्टे पाहून हर्षमोद झाले…..

Loading

आज पहाटे साक्री रोडवर मॉर्निंग वॉक वाले आले आणि गतिरोधकाचे पांढरे पट्टे पाहून हर्षमोद झाले

धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला धन्यवाद दिले !

धुळे- ‘साक्री रोड चकाचक झाला पण गतिरोधकाने रिझल्ट काळवंडला’ या शिर्षकाखाली वृत्तपत्र व समाज माध्यमांवर वृत्त प्रसिद्ध झाले होते. धुळे सार्वजनिक विभागातील कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या टीमने दखल घेऊन तातडीने साक्रीरोडवरील स्पीडब्रेकर वर रात्री पांढरे पट्टे मारले व पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरीकांनी हे नयनरम्य, आकर्षक लक्षवेधी पांढरे पट्टे पाहून तत्परता दाखविणाऱ्या धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला धन्यवाद दिले. वृत्ताची तात्काळ दखल घेत लोकसेवक म्हणून तत्परतेने आपली जबाबदारी निभावली. त्याबद्दल साक्री रोड परिसरातील कॉलनी रहिवाशांनी धन्यवाद देत आनंद व्यक्त केला. झालेले काम प्रथम दर्शनी नक्कीच कौतुकास्पद मनभावे केले दिसून येत आहे. जे.के. ठाकरे चौक व सुरेंद्र डेअरी जवळही अद्याप अपघाती पॉईन्ट असल्याने गतिरोधक टाकण्यात यावेत ही मागणीही पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करून त्याबाबत ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागरीकांतर्फे ‘जरतारी’ आभार मानले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *