महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई चे कृतीसत्राचे आयोजन.
![]()

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई चे कृतीसत्राचे आयोजन.
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांचे सन 2023- 24 चे कृती सत्र कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आले यावेळी कृती सत्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच उपस्थित माजी अध्यक्ष सुभाष माने, सध्याचे महामंडळाचे अध्यक्ष जे के पाटील, विद्यासमिती अध्यक्ष विजय पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले
मंचावर उपाध्यक्ष व्ही जी पवार, मोझर, गणपुले, बीबी पाटील,कोषाध्यक्ष संदेश राऊत, सहसचिव सुनील पंडित, संचालक श्री घुगरे सर, माझी सचिव आदिनाथ थोरात, प्रसाद गायकवाड, श्री दिलीप कडू, श्री वामन तर्फे, गुरुदास कुसगावकर सर, मातोंडकर सर, तानाजी माने, नंदकुमार सागर, संजय झांबरे, अमृत कुमार पांढरे, संभाजी पाटील, मुंबईचे संजय पाटील, जयसिंग कदम सर, कोल्हापूरचे चेअरमन राहुल पवार, आर वाय पाटील , बाबा पाटील, सुरेश संकपाळ, शिवाजी कोरवी, एन आर भोसले, उदय तोरवणे,आर डी निकम , मुख्याध्यापक संघ ठाण्याचे गणेश पाटील, प्रवीण लोंढे,विजय राणे , पंजाब बडगे, अनिल पाटील, कांबळे सर, व मडके सर व इतर सर्व मुख्याध्यापक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते..
कृतीसत्रामध्ये मुख्याध्यापकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या व अन्य विषयावर कृती सत्रात चर्चा व मार्गदर्शन आयोजित केलेले होते.

