1 min read

आईचा 85 व्या वर्षी दवाखान्यात कर्करोगाशी झुंज परीवाराने साजरा केला वाढदिवस

Loading

आईचा85 व्या वर्षी दवाखान्यात कर्करोगाशी झुंज परीवाराने साजरा केला वाढदिवस,,,,,,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील हातनुर येथील रमेश राजधर पाटील यांची काकू मुंबई येथील ठाणे येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये वयाच्या 85या वर्षी वैजंता बाई पुंडलिक पाटील या कर्करोगाशी झुंज देत परिवाराने आपल्या आईचा 85 वा वाढदिवस दवाखान्यात केक कापून साजरा करून आईचा आनंद द्विगुणित केला आई ही आईच असते माया ममता आणि वात्सल्य प्रेम आई मध्ये दिसतात आई जोपर्यंत या जगात आहे तोपर्यंत मुलांवर तिचे प्रेम असते मुलगा कितीही आईच्या तिरस्कार करो मात्र आई ही आईच असते आजही समाजात आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आहेत तर काही आई-वडिलांसाठी संपूर्ण जीवनात कमावलेला पैसा दवाखान्यात आई-वडिलांसाठी गमावणारे आहे असाच प्रसंग
शिंदखेडा तालुक्यातील हातनुर येथील होमगार्ड रमेश राजधर पाटील व रावण राजधर पाटील यांचे काका पुंडलिक उत्तम पाटील मुंबई येथे माथाडी कामगार म्हणून स्थायिक झाले त्यांना तीन मुलं एक मुलगी तीनही मुलं मुली मुंबई येथे नोकरी असून तेथेच वास्तव्यास आहेत मोठा मुलगा रवींद्र पाटील हा कस्टम पीएसआय पदावर कार्यरत आहे दुसरा राजेंद्र पाटील एसटी महामंडळात तर तिसरा मुलगा, संजय पाटील रिलायन्स कंपनीत कामास आहे तर मुलगी जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षिका आहे संपूर्ण कुटुंब सुसंस्कृत आणि सुशिक्षित असून घरात आनंदी आनंद असताना आपली आई वैजंता बाई पुंडलिक पाटील वय वर्ष 85यांची अचानक तब्येत बिघडली यावेळी तिघे मुलांनी आपल्या आईला ठाणे येथील खाजगी सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले यावेळी डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट काढून चेक केले असता त्यांना अंतिम टप्प्यातील हाडांचा कर्करोग अंतिम टप्प्यात असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर तीनही मुलं व मुलगी हथबल झाले मुलांनी आपल्या आई-आईच्या उपचारासाठी खाजगी दवाखान्यात पाण्यासाठी पैसा खर्च केला दवाखान्यातील उपचार करून डॉक्टरांनी वैजयंताआईस घरी घेऊन जाण्यास सांगितले मुलांनी घरीच दवाखानातिल सुख सोयी उपलब्ध करून दिल्या व घरीच आईनवर उपचार चालू आहे घरी आल्यावर आईचा 85 वा वाढदिवस तिघं मुलं सुना मुलगी पती नातू नातवंडे संपूर्ण परिवाराने साजरा करण्याचे ठरवले यावेळी घरात फुगे तसेच केक कापून आईचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या आनंद द्विगुणित करण्यात आला
चौकट,,,,,,,,
आईसाठी पाण्या सारखा पैसा खर्च केला मात्र डॉक्टरांनी हाडांच्या कॅन्सर व तिसऱ्या स्टेप मध्ये असल्याने घरी घेऊन जाण्यास सांगितले घरी दवाखाना प्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिले आहेत आई आहे म्हणून मी आज या अधिकारी पदावर जाऊ शकलो ममता प्रेम वात्सल्य आई मध्ये दिसते
रवींद्र पाटील कस्टम अधिकारी मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *