1 min read

“अष्टपैलू अत्रे “एक आगळावेगळा कार्यक्रम रंगमंचावर

Loading

“अष्टपैलू अत्रे “एक आगळावेगळा कार्यक्रम रंगमंचावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे १३ आगस्ट २०२३ पासून १२५ वे जयंती वर्ष साजरे होत आहे.
त्यानिमित्ताने ‘सूत्रधार ‘ तर्फे ‘अष्टपैलू अत्रे ‘ हा सांगितिक कार्यक्रम सादर रंगमंचीत करणार आहोत.
कार्यक्रमाची संकल्पना सुप्रसिद्ध व्रुत्त निवेदिका शिबानी जोशी यांची असून संहिता अनिल हर्डीकर यांची आहे.
आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेली विविधरंगी गाणी हेही या कार्यक्रमाचे आकर्षण आहे.
२!! ते ३ तासाचा हा कार्यक्रम आपण आपल्या संस्थेत आयोजित करावा अशी नम्र विनंती शिबानी जोशी व
अनिल हर्डीकर यांनी केली आहे.

“हास्य मुद्रा “आणि “अरे प्रश्न अरे प्रश्न प्रश्न आरे अरे”. या दोन कार्यक्रमात मराठी साहित्यातील विनोदाचे प्रकार आणि इतिहास ते सांगतात . साहित्य आणि मनोरंजन दोन्ही या कार्यक्रमातून होत असते. हा कार्यक्रम गणपती मंडळ, वाचनालय, ज्येष्ठ नागरिक संघ ,महिला मंडळ ,शाळा कॉलेजची मराठी वांग्मय मंडळ इथे करायला सुयोग्य आहे. यांचे 80 हून अधिक शो दुबई सह अनेक ठिकाणी झाले आहेत.कार्यक्रमाचे मानधन ऐच्छिक आहे .तरी आपण आपल्या लोकप्रिय मंडळात आमचा कार्यक्रम ठेवून मराठी साहित्यातील विनोदी लेखक, विनोदाचे प्रकार उलगडून दाखवण्याची संधी द्याल अशी आशा आहे अशी अपेक्षा आहे शिबानी जोशी, अनिल हर्डीकर यांनी व्यक्त केली आहे संपर्कासाठी
9820317562 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *