1 min read

जयेश चौधरी ची आयरलेंड (युरोप )ला M.S.च्या शिक्षणासाठी निवड

Loading

जयेश चौधरी ची आयरलेंड (युरोप )ला M.S.च्या शिक्षणासाठी निवड

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा निंभोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. आर. चौधरी व श्रीमती पुष्पलता चौधरी (पदवीधर शिक्षिका, बालमोहन विद्यालय चोपडा ) यांचे कनिष्ठ चिरंजीव जयेश नारायण चौधरी याची नुकतीच उच्च शिक्षणासाठी Griffith college Dublin Ireland( आयरलंड) (यूरोप ) येथे मास्टर ऑफ सायन्स इन फार्मास्यूटिकल बिसनेस अँड टेकनोलॉजि या शिक्षणासाठी निवड झाली. चि.जयेश हा मागील वर्षी एच. आर. पटेल फार्मसी कॉलेज शिरपुर येथून बी . फार्मसी पदवी चे शिक्षण डिस्टिंगशन ने पास झाला आणि मेडिडायजेस्ट या अमेरिकन कंपनीत Physician Health Advisory Department Assistant या पदावर काम करत आहे पन त्याने पुढील उच्च शिक्षणासाठी मास्टर ऑफ सायन्स(विदेशात )करण्यासाठी पात्रता परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाला आणि जागतिक टॉप रँकिंग असलेले Griffith College Dublin(आयरलॅंड) यूरोप मध्ये प्रवेश मिळवला.
या अगोदर मागील महिन्यात एन आर चौधरी यांचा जेष्ट चिरंजीव रोहित चौधरी याची M.S. साठी आयर्लंड इथे निवड झाली आहे..
जयेश चौधरी व रोहित चौधरी यांचे व पालकांचे अभिनंदन हिंदी अध्यापक मंडळाचे मार्गदर्शक संदीपजी घोरपडे, वसुंधरा दशरथ लांडगे,सोपान भवरे, हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर,सचीव दिलीप पाटील,कोषाध्यक्ष तथा साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक राजेंद्र पाटील,व मंडळाचे मा.तालुकाध्यक्ष दिपक पवार,ईश्वर महाजन, प्रदीप चौधरी, ,डॉ किरण निकम,कमलाकर संदानशिव,कविता मनोरे, सौ योग्येश्वरी पाटील,श्रीमती मंगला चव्हाण,मुनाफ तडवी,प्रशांत वंजारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *