1 min read

आज पियुष गोयल यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण सहकारी संस्थांचा मेळावा

Loading

आज पियुष गोयल यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण सहकारी संस्थांचा मेळावा

मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार, २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार, १६ मे २०२४ रोजी सायंकाळी ८ वाजता उत्तर मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ठाकूर व्हिलेज हॉल, राम नारायण मार्ग, पिझ्झा हटच्या मागे, चॅलेंजर टॉवर, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पूर्व येथे हा मेळावा होणार असून मेळाव्याला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, उत्तर मुंबईचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पियुष गोयल, भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी पियुष गोयल उपस्थित संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शनही करणार आहेत. या मेळाव्याला मोठ्या संख्येने गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *