विप्रो एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर मार्फत मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मतदातांचे यांचे उस्फुर्त स्वागत .
![]()




विप्रो एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर मार्फत मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मतदातांचे यांचे उस्फुर्त स्वागत .
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यात आज दिनांक 13 मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान पार पडले या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध सामाजिक संस्थेच्या मदतीने जास्तच जास्त मतदार आपले मतदानाचा हक्क बजावतील यासाठी जागृती करण्याचे आव्हान केले होते. या उपक्रमांतर्गत विप्रो इंटरप्राईजेस अमळनेर आणि आधार संस्था अमळनेर यांच्यामार्फत अमळनेर शहरातील ग. स. हायस्कूल अमळनेर, शिवाजी हायस्कूल तांबेपुरा, अनिल अंबर पाटील हायस्कूल, गांधलीपुरा इत्यादी मतदान केंद्रांवर मतदात्यांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. तसेच संस्थेमार्फत मतदान केंद्रावर आकर्षक सजावट करण्यात आली होती .त्यापैकी सर्वांचे आकर्षण म्हणजे ज्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. त्यामध्ये मी मतदान केले आपणही करा असा संदेश देण्यात आला .सार्वत्रिक निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो त्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पाहिजे .अशा प्रकारचा संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली होती .या उपक्रमामध्ये जास्त जास्त मतदार आपला सहभाग नोंदवत होते .सदर उपक्रमासाठी अमळनेर उपविभागीय दंडाधिकारी माननीय महादेवजी खेडकर व रुपेश कुमार संचेती तहसीलदार अमळनेर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून संस्था राबवीत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. सदर उपक्रमासाठी विप्रो एंटरप्राइजेस यांनी विशेष सहकार्य दिले. यावेळी विप्रो कंपनीचे जितेंद्र शर्मा कॉलिटी मॅनेजर ,जे. व्ही. सर, प्रोडक्शन हेड ,नितीन जोशी मॅनेजर, हरीश माहुरे ,मेंटेनेस मॅनेजर इत्यादी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बूथ वर येऊन मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सदर उपक्रमाचे नियोजन विप्रो कंपनीचे फॅक्टरी इन्चार्ज -विजय बागजीवाला ,मिलिंद मार्कंडे- परचेस मॅनेजर, चेतन थोरात -एच.आर. मॅनेजर, सुधीर बडगुजर, वेल्फेअर ऑफिसर तसेच आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील व संचालक रेणू प्रसाद यांनी नियोजन केले होते
आधार संस्थेमार्फत मुरलीधर बिरारी, दीपक संदानशिव ,संजय कापडे, अश्विनी भदाणे, यास्मिन शेख, दीपक विश्वेश्वर, ज्ञानेश्वरी पाटील, संदेश संदानशिव, नंदिनी मैराळे ,तोसिफ शेख, राकेश महाजन, सुषमा वाघ ,, भावना सूर्यवंशी ,कल्पना सूर्यवंशी, विकी राजू शिरसाठ इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

