1 min read

जागतिक मातृदिन निमित्ताने माय ,माऊली,बोला आई,आजकाल ती दुःखात आहे लयी…

Loading

जागतिक मातृदिन निमित्ताने
माय ,माऊली,
बोला आई
आजकाल ती
दुःखात आहे लयी

आज फक्त मातृदिन स्टेटस व शो म्हणून मातेची गाणी बस ….इतकं काय ते आईचं ममत्व मायची बेगडी महती सगळीकडे दिसते.खर पचत नाही पण खरं ते खरंच असतं अगदी सूर्य प्रकाशा सारख. तुम्ही बोलाल काय आम्हाला शाब्दिक चिमटा घेतोय तू काय मायसाठी असं काही केलं आहे ज्याचा जोरावर आम्हाला शिकवतोय……खरं आहे तुमचं ….पण मला दोन गोष्टी सांगण्याचा नैतीक अधिकार आहे.कारण माझी आई मला खूप जीव लावून आज ही पोसते.तुम्ही आईला सांभाळत असाल तिला टोमण मारत असाल तिच्या म्हातारपणी तिला नको ते बोलत असाल कदाचित…पण विचार करा असे मुलं जे जन्मतः पाय रूळ असणार .ज्याला चालता येत नाही जे दोन वेळच जेवणासाठी जड ज्याचं भविष्य अंधकारमय ना त्याला कोणी साथ जन्माची सोडा एका जन्माची ही साथ देवू शकणार नाही अशा बाळाला वाढवणं शिकवण समाजाच्या लंगड्या ची माय हे बोचरी टीका सहन करणं.पण हे सगळं सहन करुन ही ती माय माऊली या लंगड्या ची आयुष्य संजीवनी होते.तिला त्याचे. हाल पाहवले जात नाही पण तरी ही ती जगवते या लंगड्या पांगळा ला.अशा असंख्य माय माऊल्या आहेत .ज्यांचे काळजाचे तुकडे अंध अपंग मतीमंद मूक असतील.तरी ही ते जगवतात या जगाशी लढतात हे योद्धा पेक्षा कठीण आहे.योद्धा तर एखादी लढाई लढतो.पण दिव्यांच्या माता रोज लढतात.या दिव्यांच्या भाऊ बहीण तर आपापल्या स़ंसार थाटून रमून जातात स्वार्थ मतलब साधून घेतात . आतड्याला साधी कातड्याची ओढ उरत नाही.पण दिव्यांच्या माता थरथरत्या हाताने म्हातारपणी सुद्धा त्यांना सा़भाळतात.अगदी शेवटच्या श्वासापर्यंत……
‌जर तुम्हाला तुमच्या आईची महती तिचा त्याग फक्त शाब्दिक कळला असेल तर तूम्ही पाषाण काळजाचे आहात.देवा शपथ जर तुम्ही एखाद्या दिव्यांच्या आईला भेटलात तिला विचारले की तुम्ही का या निकामी ज्याच्या शरीराकडे पाहवस ही वाटतं नाही त्याला का जगवता…त्याच्या व्यथा वेदना का वाढवता उलट तुम्ही त्याला मारुन मुक्ती देवू शकता तर ती आई तुम्हाला कानाखाली देईल….अन् क्षणात तुम्हाला आई कळेल ..
माय माता ही फक्त जीव लावून बाळासाठी श्वास असते.बाळ कस ही असलं लुळे पांगळा आंधळ मुक मतीमंद तरी ते तिचं काळीज असतं बास…..
तुम्हाला कळ कळीची विनंती निदान आज तरी आईशी चांगले वागा बस

लेखक-प्रा.प्रकाश पाटील अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *