इंन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट & रिसर्च (आय एम आर ) येथे मतदान जनजागृती संपन्न :-
![]()


इंन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट & रिसर्च (आय एम आर ) येथे मतदान जनजागृती संपन्न :-
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव शहरात & जिल्ह्यात जनजागृती शासकीय यंत्रणेमार्फत मार्फ़त & विविध सेवाभावी संस्था मार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आहे. .
आय एम आर तर्फे मतदान जनजागृती संपन्न झाली
आय एम आर चे प्राचार्य श्री पवार सर, गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे अधिकृत आयकॉन मदन रामनाथ लाठी आणि जळगाव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री गिरीश रमनलाल भावसार उपस्थित होते.
जळगाव जिल्हा लोकसभा निवडणूक २०२४ चे आयकॉन मदन लाठी यांनी मतदानाचे महत्त्व थोडक्यात पटवून दिले आणि १३ मे रोजी पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान करुन सोबत घरातील, आजुबाजुचे, नातेवाईकांना विनंती करून जसे आपण उत्सव साजरे करतो त्या प्रमाणे १३ मे हा साजरा करावा हि विनंती करून उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
(बीएलओ ) महात्मा गांधी स्काऊट पथक प्रमुख श्री गिरीश भावसार यांनी
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान प्रक्रियेत झालेल्या बदलाची माहिती दिली, मतदार यादीत नाव शोधणे, SMS सुविधा समजावून सांगितली आणि उपस्थितांचे शंका निरसन केले.

