बाबासाहेबांचे संविधान मोडीत काढणाऱ्यांना रोखण्यासाठी 11 मे रोजी ‘संदेश भूमी’ येथे समस्त बुद्धीजीवींची बैठक
![]()
बाबासाहेबांचे संविधान मोडीत काढणाऱ्यांना रोखण्यासाठी 11 मे रोजी ‘संदेश भूमी’ येथे समस्त बुद्धीजीवींची बैठक
ज्येष्ठ नेते प्रा. बाबा हातेकर यांचे उपस्थितीचे आवाहन

धुळे प्रतिनिधी- ज्यांचे पूर्वज आरपीआय मध्ये नेतृत्वस्थानी होते, ज्यांना मानसन्मान मिळाले त्यांचे वंशज आज भरकटलेले आहेत ते एव्हढे की बाबासाहेबांच्या संविधानाला मोडीत काढणाऱ्यांना काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष मदत करण्याचे राजकारण करीत आहेत. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शनिवार दि. 11 मे रोजी सायंकाळी 5 वाजता ‘संदेश भूमी’ येथे उपस्थित रहावे असे आवाहन आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रा. बाबा हातेकर व प्राचार्य डॉ. सुरेंद्र मोरे यांनी केले आहे. प्राचार्य बाबा हातेकर यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, बाबासाहेबांनी महापरिनिर्वाणापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा केली होती. त्याचवेळी धम्मचक्र प्रवर्तन,हिंदू कोड बिलाचा लढा यामुळे त्यांच्या हयातीत आर.पी.आय.ची स्थापना होऊ शकली नाही. परमपूज्य बाबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी 3 ऑक्टोबर 1957 रोजी आर.पी.आय.ची स्थापना केली. ज्यांचे पूर्वज त्या आर.पी.आय.मध्ये नेतृत्वस्थानी होते. ज्यांना मानसन्मान मिळाले त्यांचे वंशज आज भरकटलेले आहेत ते एवढे की, बाबासाहेबांच्या संविधानाला मोडीत काढणाऱ्यांना काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष मदत करण्याचे राजकारण करीत आहेत.हे आता लपून राहिलेले नाही. आपण सक्रिय राजकारणी नसलो तरी आपला बाप देऊन गेलेले संविधान ज्यात आपला मताधिकार आहे त्याचे रक्षण करण्याची ऐतिहासिक जबाबदारी आपली आंबेडकरी बुद्धीजींची आहे.आपणास हे सांगण्यापूर्वी मी काही डॉक्टर, वकील,प्राध्यापक व इतर मित्रांशी प्रत्यक्ष भेटून,फोनवरून संपर्क करून बोललो आहे. सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला,येण्याचे आश्वासनही दिले, कुणीतरी पुढाकार घ्यावा म्हणून मी घेतला एवढेच. दलित रिपब्लिकन आंबेडकरी जनतेला मार्गदर्शनाची गरज आहे. विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी संदेशभूमी येथे शनिवार दिनांक 11 मे वेळ -सायंकाळी 5.00 वाजता थोडा वेळ द्यावा अशी विनंती प्राचार्य बाबा हातेकर, प्राचार्य डॉ सुरेंद्र मोरे यांनी केली आहे.

