1 min read

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तीन वेळेस करणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी.

Loading

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तीन वेळेस करणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी.

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करीता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वहीची तपासणी करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च त्यांच्या खर्च नोंद वहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करणार आहेत.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणीचे वेळापत्रक असे (अनुक्रमे तपासणी क्रमांक, दिनांक, वार आणि वेळ या क्रमाने) : प्रथम तपासणी, 9 मे 2024, गुरुवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. द्वितीय तपासणी, 13 मे 2024, सोमवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. तृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. तपासणीचे ठिकाण निवडणूक निर्णय अधिकारी, 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ, अर्थ व सांख्यिकी सभागृह, प्रशासकीय इमारत, आठवा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट E-1, भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, खर्चाची मूळ प्रमाणक (Invoce, GST क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/Bank Statement, सर्व परवाने (वाहन, रॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहीत वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *