आदर्श शिक्षक प्रा.अर्जुन उगलमुगले राज्यस्तरीय “शिक्षण दर्पण” पुरस्कार प्रदान
![]()


आदर्श शिक्षक प्रा.अर्जुन उगलमुगले
राज्यस्तरीय “शिक्षण दर्पण” पुरस्कार प्रदान
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयित्री बहिणाबाई साहित्य परिषद, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय *" शिक्षण दर्पण "* हा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कल्याण येथील ॲचिवर्स महाविद्यालयाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला.प्रा उगलमुगले हे गेली २४ वर्ष ज.ए. इ. दादर या संस्थेच्या न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करीत आहेत यावेळी ज्येष्ठ साहित्यिक गजानन ओक, महाराष्ट्र साहित्य परिषदचे अध्यक्ष विष्णू पाटील, बृहमुंबई मनपा माध्यमिक शिक्षण विभागाचे माजी शिक्षणाधिकारी मा.श्री.भानुदास बोराळे, बृ.मनपा शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आनंदराव सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.अर्जुन उगलमुगले यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

