1 min read

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे मतदान जनजागृती व स्काऊट शिक्षण एक संस्कार विषयावर व्याख्यान संपन्न

Loading

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे मतदान जनजागृती व स्काऊट शिक्षण एक संस्कार विषयावर व्याख्यान संपन्न

जळगाव – रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे मतदान जनजागृती व स्काऊट शिक्षण एक संस्कार या विषयावर गणपती नगर येथील रोटरी हॉल येथे व्याख्यान संपन्न झाले. व्यासपीठावर रोटरी अध्यक्ष श्री. आर. एन. कुलकर्णी, मानद सचिव श्री. अँड. किशोर पाटील, मतदान जनजागृती प्रतिनिधी श्री. मदनलाल लाठी उपस्थित होते.
यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री. गिरीश रमनलाल भावसार यांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली तसेच म. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी दिलेल्या लोकशाही उत्सवाच्या पत्राचे वाचन केले. यानंतर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आवाहन करून निवडणूक प्रक्रियेतील झालेले बदल, मतदार यादीत नाव शोधणे, SMS सुविधा समजावून सांगितले. यानंतर स्काऊट विभाग प्रमुख श्री. देवानंद पांढरे यांनी स्काऊट गाईड म्हणजे जीवन जगण्यासाठी उत्तम संस्काराचा नियोजनबद्ध आराखडा असून स्काऊट गाईड या आंतरराष्ट्रीय चळवळीचा इतिहास विषद केला. यावेळी स्काऊट प्रार्थना, रामधून झेंडागीत, नियम, वचन व ध्येय सांगून याविषयी माहिती सांगितली. स्काऊट राष्ट्रपती, राज्य पुरस्कार, पंतप्रधान ढाल स्पर्धा यावर प्रकाशझोत टाकला.
प्रारंभी आरती कुलकर्णी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट हर्षल बडगुजर याचा देखील सत्कर करण्यात आला. कार्यक्रमास किशोर सूर्यवंशी, विवेक वडजीकर, अपर्णा मकासरे, दत्तात्रय चौधरी, चिरमाडे सर, उज्वला पाटील, योगेश चौधरी, दिनेश बडगुजर आदि उपस्थित होते. आभार श्री. विवेक वडजीकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *