1 min read

कै.श्री. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा….

Loading

कै.श्री. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा….

अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री.दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बुधवार दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी 'जय जय महाराष्ट्र माझा' असा जयघोष केला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चेअरमन माननीय श्री.उत्कर्ष पवार तसेच संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री.उमाकांत पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून झाली. यावेळी संस्थेच्या सचिव सौ अलका पवार, प्राचार्या वर्षा सोहिते तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो प्रत्येकाला गर्व असावा असा आपला हा महाराष्ट्र! अशा या महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष होऊन गेले आहेत असे वक्तव्य करून महाराष्ट्र दिन व कामगार दिन याविषयीची माहिती आपल्या मनोगतातून शाळेच्या सचिव सौ.अलका पवार यांनी दिली. महाराष्ट्र दिनाबरोबरच शाळेत आज दि १ मे रोजी प्राथमिक व पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक निकालपत्रकही वाटप करण्यात आले.यावेळी आपल्या पाल्यांच्या एकूण शैक्षणिक प्रगती बाबत पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या सौ. वर्षा सोहिते यांनी केले यासाठी त्यांना शिक्षिका योगिता फालके, पल्लवी येवले,सुवर्णा पाटील, मनीषा शिरसाठ,स्वाती चव्हाण,संगीता पाटील, नेहा जाधव,भारती गव्हाणे यांचे अनमोल सहकार्य लाभले. संस्थेचे चेअरमन माननीय श्री. उत्कर्ष पवार यांनी दिलेल्या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छांसोबत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *