1 min read

सावधान.. उष्णतेची लाट; वेळीच व्हा अलर्ट,आरोग्य विभागाने केल्या सूचना जारी : नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन.

Loading

सावधान.. उष्णतेची लाट; वेळीच व्हा अलर्ट,आरोग्य विभागाने केल्या सूचना जारी : नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन.

जळगांव- जळगावसह सम्पूर्ण राज्यभर उन्हाचा तडाखा जाणवत आहे, जळगावला उन्हाचा पारा ४३℃ च्या पुढे गेला असुन त्यामुळे मार्चपासूनच राज्यात उष्मघाताच्या रुग्णांची झपाट्याने वाढ झाली आहे, याचे राज्यात १९२ उष्मघात रूग्ण आहेत.
उष्णतेची मोठी लाट उसळल्यामुळे, राज्यतील सर्व नागरिकांनसह प्रशासनाने देखील सतर्क रहावे, आशा सूचना आरोग्य विभागाने, जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.
याच अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग व सर्व वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हास्तरीय बैठकीत उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट राहण्याच्या सुचना केल्या आहेत.
या आधीच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित, थंडगार, हवेशीर असे उष्मघात कक्षांची (क्षीत केंद्रे) स्थापना करण्यात आलेली आहेत.

आरोग्य संस्थांना केलेल्या सूचना:-

आरोग्य केंद्रांत उष्मघात कक्ष (क्षीत केंद्र) स्थापन करणे,
अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे, पुरेसा औषधींचा साठा ठेवणे, ओआरएस कॉर्नर, स्वच्छ व थंड पाणी व्यवस्था, कर्मचऱ्याना उष्मघात समजून घेण्यासाठी प्रशिक्षीत करणे, यासह वृद्ध,लहान मुले, कोमॉर्बीड व्यक्ती,रस्त्यावरील, उन्हांत काम करणारे कामगारांवर लक्ष ठेवणे, अशा सूचना आरोग्य यंत्रणेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिलेल्या आहेत.

अलर्ट! घराबाहेर पडणाऱ्यांसाठी जिल्हा आरोग्य विभागाने जारी केल्या विशेष सूचना:

नागरिकांनो 👉 या गोष्टी करा :

१) उन्हाळ्यात भरपूर प्यावे. तुम्हाला तहान लागली नसेल तरी देखील वारंवार पाणी प्यावे.
२) वाढत्या उष्णतेमुळे प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
३) नागरिकांनो घराबाहेर पडल्यावर ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचा ज्यूस प्यावे.
४) उन्हाळ्यात शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घाला.
५) उन्हाळ्यात घराबाहेर पडताना छत्री, टोपीचा वापर करा.
६) सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालावा.
७) तुमचे घराबाहेर काम असेल तर ऊन कमी झाल्यावर करावे.

नागरिकानो 👉 या गोष्टी करू नका :

१) उन्हाळ्यात दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
२) दुपारच्या वेळी बाहेर पडल्यावर जाड वस्तू उचलू नका.
३) अनवाणी पायांनी बाहेर पडू नका.
४) अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे शक्यतो टाळावा.
५) घराभोवती हवा येणासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
६) सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळावे.
७) शिळे अन्न खाणे टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *