1 min read

सीनियर रिपोर्टर प्रल्हाद खर्चे यांना पद्मश्री डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा ‘पुरस्कार जाहीर

Loading

सीनियर रिपोर्टर प्रल्हाद खर्चे यांना पद्मश्री डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा ‘पुरस्कार जाहीर
पुणे: अत्यंत प्रतिष्ठेचा पत्रकारिता व सामाजिक,अध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील कार्याबद्दल देण्यात येणारा पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहिर झाला आहे. हा पुरस्कार राष्ट्रसेवा समिति महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने प्रल्हाद गोपाळ खर्चे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिंदु रत्न पुरस्कार विजेते, डॉ.रवींद्र भोळे यांनी प्रतिनिधी जवळ महिति दीली आहे. प्रल्हाद खर्चे हे सीनियर प्रेस रिपोर्टर आहेत, दिल्ली येथील राष्ट्रीय प्रसार दैनिकांमध्ये ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक व पत्रकारिता ,क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेने, निरपेक्षपणे, निरंतर अनेक दशकाहून अधिक काळ त्यांनी कार्य केलेले आहे. प्रल्हाद खर्चे यांना मॅगसेस अवॉर्ड विनर पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई यांच्या जयंतीदिनी दिनांक 27 एप्रिल शनिवारला सायंकाळी सहा वाजता एका खास समारंभामध्ये वरील पुरस्कार प्रदान करण्यात येईल. हा कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सरदार वल्लभाई पटेल चौक मंगळवार पेठ पुणे स्टेशन जवळ येथे होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय राज्य पातळीवरील पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉ. रविंद्र भोळे यांनी प्रतिनिधी जवळ ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *