1 min read

कल्याण मारोती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त अनेक भाविकांनी घेतले दर्शन….

Loading

कल्याण मारोती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त अनेक भाविकांनी घेतले दर्शन….

अनेक भाविकांनी महाप्रसाद चा घेतला लाभ …

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
-महारुद्र, हनुमंत, बजरंगबली, मारूती, महावीर, पवनपुत्र, पवनसुत अशा अनेक नावांनी संबोधल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती देशभरात साजरी केली जाते.हनुमानाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीमध्ये कल्याण मारुती महादेव मंदिरात हनुमान जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.. सकाळी एकता मित्र मंडळाच्या वतीने मंदिराची स्वच्छता, आजूबाजूचा परीसर स्वच्छ करण्यात आला..
हनुमान मंदिरात आरतीचा भाविकांनी लाभ घेतला. हनुमान मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे.. मंदिरातील अनेक भाविकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असे एकता मित्र मंडळाचे श्रीकांत गोसावी,संजय पाटकरी यांनी बोलतांना सांगितले..
कल्याण मारोती मंदिर येथे…
हनुमान जयंती निमित्त भाविकांनी दर्शन घेतले. महाप्रसादाचा लाभ
विदयाविहार कॉलनी ,पटवारी कॉलनी सप्तशृंगी कॉलनी,सुरभी काँलनी,मुदंडा नगर,शाहू नगर, येथील भाविकांनी घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीएकता मित्र मंडळाचे सदस्य रवि पाटील,
संजय पाटकरी,श्रीकांत गोसावी,
कपील पाटील,राज लाड,प्रविण पाटील,योगेद्र महाजन, सागर विसपुते,योगेश शिरसाट,मोहित पवार
कल्पेश साळुंखे,महेश पाटील,कवीश पाटील,किरण आहिरे,भगिरथ पाटील
विवेक तेले,स्वप्निल पाटील,विजय येवले
योगेश एन पाटील,मनोहर मोरे,
विवेक पाटील,अनिरुद्ध पाटील,राज सोनवणे,सागर पाटील यांनी प्रयत्न केले. तर कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य मातोश्री टेन्टचे मालक विनोद पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *