1 min read

साने गुरुजी विद्यालयात उन्हाळी शिबिर

Loading

साने गुरुजी विद्यालयात उन्हाळी शिबिर
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे त्यातच ऊन्हाच्या तीव्र झडा बसायला सुरुवात झाली आहे. पारा 43 ते 44 च्या घरात असल्याने असह्य ऊकाळा जाणवत आहे. जनजीवन विस्कळीत झालेले आहे.यात शालेय विद्यार्थी घराबाहेर पडू शकत नाही. घरात बसून सुद्धा टीव्ही अथवा मोबाईल या गॅझेटमध्ये गुरफटलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी साने गुरुजी विद्यालयात क्रिकेटचे उन्हाळी शिबिर सुरू झाले आहे. या शिबिरात मुलांचा उत्स्फूर्त असा सहभाग बघायला मिळत आहे. दीडशे ते दोनशे विद्यार्थी या शिबिरात सहभागी झालेले आहेत. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून त्या दृष्टीने प्रशिक्षक परेश सोनवणे व राकेश पवार परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास करून समाजामध्ये एक सक्षम नागरिक निर्माण झाला पाहिजे यासाठी खास करून या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदर शिबिरासाठी संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी तथा क्रीडा शिक्षक विलास चौधरी, डी ए धनगर आदी सहकार्य करीत आहेत.
तसेच शिबिरासाठी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिबिरासाठी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा कळवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *