1 min read

अजितकुमार जाधव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Loading

अजितकुमार जाधव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

लोणंद प्रतिनिधी : समाजमनाचा सामाजिक, वैचारिक ,बौद्धिक, आर्थिक, समाजहित व देशहिताच्या कार्याचा स्तर उंचवावा याकरीता महाराष्ट्रभर सुजन फौंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रबोधनाचे, थोर महापुरुषांचे विचार प्रसार व प्रचार कार्य करणारे अजितकुमार जाधव यांना समाजरत्न पुरस्काराने पाडेगाव तालुका फलटण येथे सन्मानित करण्यात आले.
अजितकुमार जाधव हे प्रामुख्याने महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या विचार प्रसाराचे कृतीशील कार्य, भारतीय स्वातंत्र्य व हुतात्म्यांना अभिवादन ,क्रांतिकार्य उजाळा,लेक वाचवा समाज घडवा ,महिला सबलिकरण, अबाल वृद्ध , विद्यार्थी व महिला करीता विविध उपक्रमांनी कार्य करतात. वीसपेक्षा अधिक पुस्तिकेचे संपादन व महापुरुषांच्या प्रतिमा, दिनदर्शिकाचे प्रकाशन करून विनामूल्य वितरित करून समाजहिताचे कार्य करीत आहेत.
पाडेगाव सामाजिक विकास फौंडेशन यांच्या वतीने महापुरुष जयंती उत्सवनिमित्ताने व्याख्यानमाला, महिला प्रबोधन व गुणगौरव समारंभ सामाजिक उपक्रमामध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अजितकुमार जाधव यांना समाजरत्न पुरस्काराने केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृतिजी इराणी यांच्या मातोश्री उद्योजिका श्रीमती शिबानी बागची यांच्याहस्ते प्रबोधनकार अभिनेत्री मेघना झुंझाम यांच्या प्रमुख उपस्थित्तीमध्ये गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमा करिता सरपंच श्री राहुल कोकरे, सौं रोहिणी जाधव, आसावरी नेवसे, प्रशांत ढावरे हे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री प्रवीण बनकर,सुत्रसंचालन गिरीश बनकर यांनी केले .कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी पाडेगाव सामाजिक विकास फौंडेशन चे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामस्थ व महिला भगिनी यांचे श्री प्रभाकर नेवसे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *