1 min read

रुबजी नगर, अमळनेर येथील आनंदघराची वर्षपूर्ती

Loading

रुबजी नगर, अमळनेर येथील आनंदघराची वर्षपूर्ती
नको दिखावा नको मिरवणे
नको उद्घाटन व सेवापूर्ती समारंभ
त्यात असे आत्मसन्मानाचा दंभ..
त्याग,सेवा,समर्पण निराधारांप्रती
क्षणोक्षणी ध्यास भावंडांची व्हावी
सर्वांगीण मूल्याधिष्ठीत प्रगती
या आदर्श कार्यसुत्रीन्वये बाल-मजूर तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मुला-मुलींना सुरक्षित आणि आनंददायी बालपण मिळावे यासाठी गेल्या एक दशकापासून वर्धिष्णू सामाजिक संस्था काम करते आहे. संस्थेच्या आनंदघर या उपक्रमाअंतर्गत वस्ती-पातळीवर आठवड्यातील ५ दिवस दररोज मुलांचे वर्ग घेतले जातात.
वर्धिष्णू अंतर्गत आज जळगाव, चोपडा व अमळनेर येथे ५ आनंदघर सुरु आहेत ज्यातील २५० हून अधिक मुलां-मुलींचे शैक्षणिक आणि आरोग्य-विषयक पालकत्व संस्थेने घेतले आहे.
गेल्या वर्षभरापासून अमळनेर येथील रुबजी नगर या ठिकाणी वर्धिष्णूच्या अंतर्गत आनंदघर उपक्रम सुरु आहे. आनंदघराच्या माध्यमातून ६०हुन अधिक मुला-मुलींसोबत दररोज काम केले जाते आहे. यामध्ये मुलांना आनंददायी आणि कृतीशील वातावरणात शालेय शिक्षण, आवश्यक जीवन-कौशल्यांची रुजवणूक, आरोग्य, व्यसनापासून दूर नेणे यावर काम केले जाते. यासोबत मुलांच्या पालकांना, समुदायातील इतर लोकांना, शाळा व समाजाला मुलांच्या सर्वांगीण विकासात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातात.
नुकताच रुबजी नगर येथे ‘आनंदघराचा’ वर्षपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आनंदघरातील मुलांनी विविध कोपऱ्यात आनंदघराच्या शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचे stall मांडले होते, ज्यामध्ये मुलेच सगळे वर्णन पालकांना व इतर लोकांना करत होते. यात अक्षर ओळख, अंक ओळख कशी केली जाते, पुस्तकांचा शिक्षणात वापर, वस्तूंचा आणि खेळाचा वापर याबद्दल मुलांनी उपस्थित लोकांना अत्यंत विस्तृत माहिती दिली. यावेळी मुलांच्या पालकांसोबतच, विप्रो अमळनेर येथील वरिष्ठ कर्मचार्यांनी देखील भेट दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदघरातील मुलांसमवेत वर्धिष्णूचे अमळनेर येथील कार्यकर्ते बजरंग पावर, प्रथमेश गोजारेकर, कांतीलाल पाडवी, योगिनी गुरव यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *