1 min read

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले,महाड चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Loading

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले,महाड चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

[ महात्मा फुले विचार अभियानास शिवप्रेमी व फुलेप्रेमी यांचा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद ] स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा वर्षानिमित्त आमने तसेच  आद्य शिवचरित्रकार महात्मा फुले यांची १९७ वी जयंती,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्त महात्मा फुले विचार अभियान व फुले प्रेमीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमान्वये प्रथमतः रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसमाधीला आणि महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.महात्मा फुले यांनी किल्ले रायगड येथील शिवसमाधी शोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहोला.सामाजिक क्रांतीसाठी पुणे येथे पहिली ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली होती ! या क्रांतिकार्याच्या सन्मानार्थ किल्ले रायगड येथे कार्यक्रम राबविण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थित शिवप्रेमीना महात्मा फुले यांची प्रतिमा व गौरवपत्र प्रदान करण्यात आले.

श्री जयसिंग लोखंडे (सातारा ), डॉ. राजू जाधव रोहा ( रायगड ), श्री राहुल जाधव, (फलटण, सातारा ), नरवीर तान्हाजी मालुसरे वंशज शीतल मालुसरे ( रायगड ), श्री तुकाराम शिंदे ( महाड ),श्री राजेंद्र नेवसे, ऍड सुनील नेवसे ( नायगाव सातारा) राजमाता जिजाऊ यांना पाचाड येथे अभिवादन करण्यात आले.महाड येथील क्रांतिस्थळ तथा चवदार तळे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चवदार तळ्यातील क्रांतिजल कलशाचे सातारा कडे प्रस्थान झाले.कार्यक्रमांस डॉ.राजू जाधव अध्यक्ष महात्मा फुले सेवा संघ, रायगड, विराज जाधव राहुल जाधव देवासी, बाळाराम, जयसिंग लोखंडे, संपतरावं जाधव, ॲड . सुनील नेवसे,राजेंद्र नेवसे, तुकाराम शिंदे,शीतल मालुसरे, कैलास महाजन, सुखदेव कदम व अजित जाधव यांनी विशेष सहभाग नोंदविला.जयसिंग लोखंडे यांनी आपल्या मुलाचा विवाह सत्यशोधक पद्धतीने करून समाजासमोर कृतीशील आदर्श निर्माण केला.डॉ राजू जाधव यांनी महात्मा फुले सेवा संघाच्या माध्यमातून फुले विचारांच्या प्रचार व प्रसार कार्याबद्दल महात्मा फुले विचार अभियान यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.महात्मा फुले विचार अभियान संकल्पक संपतराव जाधव हे छत्रपती शिवाजी महाराज त्रिशताब्दी राज्यरोहण सोहळाकरिता हजर होते.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक वर्षातील या विशेष उपक्रमास वयाच्या ७५ व्या वर्षी हजर असल्याबद्दल विशेष कौतुक व सत्कार करण्यात आला. किल्ला परिसरामध्ये सेवाभावी कार्य तसेच गडावरील व्यवसायिक महिला भगिनी यांनाही गौरवपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *