1 min read

अमळनेरला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत शिवभक्त व भिम भक्तांनी गरजूंना केले रक्तदान..

Loading

सामाजिक बांधीलकी…

अमळनेरला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत शिवभक्त व भिम भक्तांनी गरजूंना केले रक्तदान..

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत शिवभक्त व भिम भक्तांनी एकत्र येत जातीय सलोखा राखण्यासाठी व गरजुना रक्त मिळावे म्हणून रक्तदान करुन सळसळत्या तरुणाईपुढे आदर्श घालून दिला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिवनश्री रक्तपेढीत रक्तसाठा नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे संचालक संतोष पाटील यांनी सांगितले. रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे यांना कळताच त्यांनी विशाल सोनवणे यांच्याशी चर्चा करून संयुक्त रक्तदान शिबीर संकल्पना मांडली. अमळनेर युवा मित्र परिवाराने पुढाकार घेतला. रक्तदानचा कार्यक्रम जीवनश्री रक्तपेढीत पार पडला. यावेळी विशाल सोनवणे ,मनोज शिंगाणे ,योगेंद्र बाविस्कर,सागर विसपुते,अंकीत देशमुख ,तुषार सोनार ,अनंत संदानशीव ,शाहरुख शेख ,राकेश शेटे ,शुभम शेटे,विकास कुमावत ,ओम बिराडे,अथर्व डेरे ,उमेश सोनवणे,राजेश संदानशिव ,सागर वाघ ,तुषार पाटील ,दिपक प्रजापती यांचे सहकार्य लाभले. या सामाजिक कार्याचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे. सामान्य माणसाची ,गरजू माणसाची मदत करण्याचे थोर पुरुषांचे विचार , जातीय ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्या महापुरुषांना खरी श्रद्धांजली असेल म्हणून असे उपक्रम दरवेळी राबवले गेले पाहिजेत असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *