जळगाव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांच्या थकीत बिलांचा मार्ग होणार मोकळा.
![]()

जळगाव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांच्या थकीत बिलांचा मार्ग होणार मोकळा.
माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांनी घेतली शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांची भेट.
आज दुपारी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्या प्रतिनिधी मंडळाने माध्यमिक शिक्षण विभाग येथे शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम व वेतन अधीक्षक राजमोहन शर्मा यांची भेट घेऊन 2019 पासून मंजूर झालेल्या शिक्षक शिक्षकेतरांच्या थकीत वेतना संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानुसार अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांनी मंजूर झालेल्या निधीच्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे 2019 पासून चे थकीत वेतन कॅम्प घेऊन अदा करण्यासंदर्भात प्रयत्न केल्याचे सांगितले व जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्यावर केलेले आरोप की त्यांच्या हरगर्जीपणामुळे जवळपास 6 कोटी 50 लाख निधी परत गेला व काही थकीत वेतनाची संचालक कार्यालयाकडून मंजुरी न घेता कशी टाकली याची चौकशी करावी. या संदर्भात दिलेल्या तक्रार अर्जाची माहिती घेतली असता. वेतन अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाची आर्थिक तरतूद आलेली होती म्हणून संचालक मान्यता नसलेली फरक बिले सुद्धा कार्योत्तर मान्यतेच्या अधीन राहून टाकण्यात आली व ती थकीत वेतने कार्योत्तर मान्यतेला जाऊन त्यांची मान्यता घेतली जाईल.तसेच 31 मार्च 2024 पर्यंत आलेले सर्व बिल घेतलेली आहेत व त्यामुळे त्यानंतर शिल्लक राहिलेला निधी परत पाठवावा लागतो असे सांगितले. याप्रमाणे दरवर्षी असा निधी परत गेलेला असल्याचा त्यांनी आम्हाला दाखवलं. जी काही बिल आज शिल्लक असल्याचे दिसत आहे ती सर्व बिल एक एप्रिल नंतर आल्याचे त्यांनी सांगितले म्हणजेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जळगाव यांनी बिल वेळेवर न आल्यामुळे निधी परत पाठवला असल्याचे माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समिती जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांना दिली.तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव यांनी जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांनी केलेल्या आरोपामुळे एक समिती गठित करून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 2019 पासून मंजूर झालेले शिक्षक शिक्षकेतरांचे थकीत वेतन रखडलेले आहे. तरी आज रोजी झालेल्या माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी थकीत वेतन तात्काळ अदा करण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभाग व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्याची निवेदन देऊन विनंती केली. या विनंती वरून वेतन अधीक्षक वेतन अधिक्षक शर्मा साहेबांनी दोन दिवसात माध्यमिक विभागातील 35 कोटी 40 लाखाचा निधी वितरित केला जाईल असे आश्वासन दिले. आजच्या बैठकीला माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्ह्याचे समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे(संचालक जळगाव जिल्हा पूर्व. माध्य.शिक्षक शिक्षकेतर पतपिढी.),
नारायण वाघ (जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती), डॉ.मिलिंद बागुल, पी एस सोनवणे, गोविंदा पाटील, गिरीश नेमाडे, सिद्धोधन सोनवणे, कृष्णराव विसावे, रवींद्र (संचालक माध्यमिक शिक्षक पतपेढी) , संदीप घुगे (संचालक माध्य.शिक्षक पतपेढी) , गणेश काकडे (प्रोटॉन संघटना) , आनंद जाधव (आर एम बी के एस ),दिनेश पाटील उपस्थित होते.

