1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने अभिवादन..

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
साजरी निमित्ताने अभिवादन..

अमळनेर प्रतिनिधी
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ”प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. असे कार्यक्रमात महात्मा फुले हायस्कूल देवगांव देवळी हायस्कूलमध्ये शाळेचे शिक्षक यांनी सांगितले..
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे लिपिक एन.जी.देशमुख यांनी केले..यावेळी शाळेचे शिक्षक ईश्वर महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के, शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *