NMMS परीक्षेत राज्यस्तरीय मेरीट मध्ये ब्राम्हणवेल माध्य शाळेची यशस्वी निवड
![]()
NMMS परीक्षेत राज्यस्तरीय मेरीट मध्ये ब्राम्हणवेल माध्य शाळेची यशस्वी निवड
धुळे प्रतिनिधी-माळमाथा विभागातील ब्राम्हणवेल येथील कै . बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचा N M M S परीक्षेतून “राज्यस्तरीय गुणवता मेरिट “ साठी दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे .
१ ) कु . हेमलता सुरेश देसाई (इ . ८ वी )
२) कु .भूमेश्वरी रतिलाल गायकवाड ( इ . ८ वि ) हिंची निवड झालेली आहे . सदर विद्यार्थ्यांना इयत्ता ९वी पासून ते १२ वी पर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल .या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष श्री तुकाराम महाजन , संस्था सचिव श्री एकनाथ महाजन ‘ मुख्याध्यापक श्री गणेश माळी ‘ शासकीय स्पर्धा परीक्षा समिती प्रमुख श्री काशिनाथ माळी ,सर्व संचालक मंडळ ‘ सरपंच ब्राम्हणवेल ‘ ग्रांम पंचायत सदस्य श्री सुरेश देसाई , श्री रतिलाल रमेश गायकवाड ‘ केंद्रप्रमुख . सौ बेबी अहिरे मॅडम ‘ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद ‘ग्रामस्थ मंडळी व सर्व पालक मंडळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .


