1 min read

इयत्ता दहावी नंतरचे करिअर विषयावर रविवारी महासेमिनार.नोबेल फाउंडेशनतर्फे आयोजन , मुंबई येथील करिअर तज्ञ संतोष पवार यांचे मार्गदर्शन

Loading

इयत्ता दहावी नंतरचे करिअर विषयावर रविवारी महासेमिनार.

नोबेल फाउंडेशनतर्फे आयोजन , मुंबई येथील करिअर तज्ञ संतोष पवार यांचे मार्गदर्शन

जळगांव प्रतिनिधी – नुकत्याच इयत्ता दहावीच्या परीक्षा संपन्न झाल्या. इयत्ता दहावी म्हणजे जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो.दहावीनंतर विविध करिअरच्या वाटा उपलब्ध असतात. अनेक विद्यार्थी आणि पालक दहावीच्या या वळणावर करियर निवडीबाबत गोंधळात असतात. पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे दहावीनंतरचे करिअर कसे निवडावे व कसे घडवावे या विषयावर विनामूल्य महासेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर महासेमिनार दिनांक 7 एप्रिल 2024 रविवार रोजी सकाळी दहा वाजता रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या बाजूला संपन्न होणार आहे.
यावेळी मुंबई येथील सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोन वेळा राज्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त असलेले संतोष पवार आणि सुप्रसिद्ध करियर कौन्सिलर लेखक व वक्ता नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
सदर सेमिनार अंतर्गत इयत्ता अकरावी मध्ये कोणते विषय निवडावेत ? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या व्यतिरिक्त कोणते करिअर उपलब्ध आहेत. आयआयटी,नीट ,एनडीए यासारख्या करिअरमध्ये कसे यशस्वी व्हावे.करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी.अशा विविध मुद्द्यांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नोबेल फाउंडेशन तर्फे करण्यात आलेले आहे. नोबेल फाउंडेशन चे प्रशिक्षण वर्ग लगेचच 15 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी अधिक माहितीसाठी 7218501444 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *