1 min read

पिंपळी येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात मृत्युमुखी झालेल्या दिलीप पाटीलच्या परिवाराला मदतीचा हात

Loading

पिंपळी येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात मृत्युमुखी झालेल्या दिलीप पाटीलच्या परिवाराला मदतीचा हात

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी 6,30 च्या सुमारास झालेल्या गॅस सिलेंडर च्या स्फोटात दिलीप पाटील यांचा आगीत दुर्दैवाने मृत्यू झाला तर घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू व घर जळून खाक झाले ,या परिवाराला गावकऱ्यांनी आर्थिक मदत केली , त्याच प्रमाणे अमळनेर येथील नव्याने च स्थापन झालेल्या “जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर “हे सुद्धा या परिवाराला उभं रहाण्यासाठी मदतीला धावून गेलेत जायन्ट्स अध्यक्ष सुनील पाटील यांनी त्याच्या ग्रुप मधील सदस्यांना आवाहन करीत या परिवारास किराणा , चादरी , टॉवेल तसेच अन्य गृहउपयोगी वस्तू आपण यांना पुरवण्यासाठी पूर्तता करून जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर ते साहित्य घेऊन दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी पिंपळी येथे तेथील सरपंच प्रेमादादा महाजन ,पीडित कुटुंब सदस्य व अन्य गावकरी यांच्या उपस्थित त्याना सुपूर्त करून ,त्या परिवाराचे जायन्ट्स सदस्यांनकडून सांत्वन करण्यात आले
या प्रसंगी उपस्थित परिवारातील सदस्य ला मदत देताना जायन्ट्स अध्यक्ष सुनील पाटील ,राजेंद्र पाटील ,महेश पाटील, कोषाध्यक्ष ऍड राजेंद्र चौधरी, संदीप महाजन , उपाध्यक्ष रमेश महाजन, संतोष वाघ, प्रशांत पाटील ,प्रो उदय देशपांडे सर , ,दीपक मणीलाल, सरपंच प्रेमाजी महाजन ,कुटूंबीय ,आणि ग्रामस्थही उपस्थित होते ,, या उपक्रमाचे सरपंच ,उपस्थित ग्रामस्थ तसेच Dr सुधाकर महाजन यांनी खूपच कौतुक केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *