अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी(मबावि) यांच्याशी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष यांनी केली सविस्तर चर्चा
![]()
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी(मबावि) यांच्याशी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष यांनी केली सविस्तर चर्चा
जळगांव प्रतिनिधी
जळगांव जिल्हयात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या जिल्हा पातळीवरील अडचणींवर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र राऊत यांच्याशी आज सविस्तर चर्चा केली.
सदर चर्चेत पाचोरा, चाळीसगांव -०२ आणि भुसावळ या प्रकल्प कार्यालयांच्या कामकाजाबाबत संघटनेने गंभीर तक्रारी केल्या.यावर संबधित प्रकल्प कार्यालयाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अडचणी निकाली काढण्यासाठी सक्त सूचना दिल्या जातील.
पाचोरा प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी दिनेश पाटील आणि प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी जिजा राठोड यांचा चौकशी अहवाल बी.डी.ओ.कडून प्राप्त झाला असून त्यावर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी योग्य तो निर्णय घेतील.
भुसावळ प्रकल्पांतील ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची थकीत देयके तात्काळ देण्याबाबत सक्त सुचना केल्या असल्याचे श्री. राऊत यांनी चर्चेत सांगितले.
सेवासमाप्ती(रिटायर्ड) झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सर्व प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर कऱण्यात आले आहेत.एकरकमी लाभाची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
जिल्ह्यातील सुमारे १५० मिनी अंगणवाडी केंद्रांचे शासन आदेशानुसार नियमित केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असून त्याही दूर केल्या जातील.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची PFMS मध्ये चुकीची भरलेली माहिती दुरुस्त करण्यात येईल.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी लागणारा निधी,गणवेश व सादील खर्च,मोबाईल रिचार्ज, प्रवासभत्ते बिल,इंधनखर्च यांसह अन्य निधी प्रकल्प पातळीवर वर्ग करण्यात आला असल्याचे सांगितले.
सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन लागू करण्यासाठी आयुक्त कार्यालयात अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची माहिती सादर करण्यात येईल असेही नमूद केले.
कोरोनाने मृत्यू झालेल्या मंगला गणपत पाटील यांच्या विमा प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता करून वरीष्ठ पातळीवर तत्काळ सादर करण्यात येईल.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्यावरील अडचणी व्यतिरिक्त अन्य अडचणींवरही सविस्तरपणे चर्चा झाली असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविली आहे.

