1 min read

ज्येष्ठ कार्यकर्ते, साहित्यिक कवी व परिवर्तन साहित्य महामंडळाचे सरचिटणीस  वैभव काळखैर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Loading

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार यांना जाहीर. आंबेडकरी चळवळ येथील ज्येष्ठ कार्यकर्ते साहित्यिक कवी व परिवर्तन साहित्य महामंडळाचे सरचिटणीस सन्माननीय वैभव काळखैर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०१९-२०२० जाहीर झाला असून नुकताच १२मार्च २०२४रोजी एन.सी.पी. ए थिएटर नरिमन पॉईंट येथे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार नामदार संजय बनसोडे सचिव सुमंत भांगे सर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीरत्न ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक कार्याची ओढ महाविद्यालयापासूनच होती. त्यांनी केलेल्या निस्वार्थी सामाजिक व साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून सदर पुरस्कार त्यांना मिळाल्याने क्रांतीरत्न ज्योतिराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कल्याण (पूर्व) बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ,अधिदान लेखा कार्यालय कर्मचारी संघटना धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्या पाटसांगवी गावचे अनेक मंडळींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. वैभव काळखैर यांची आठवणीतले डॉ.गंगाधर पानतावणे सर, चौफेर लेखन करणारा साहित्यिक के.व्ही.सरवदे, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे संपादित गौरव ग्रंथ आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्यिक वाटचालीस अनेक साहित्यीकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *