अमळनेरला क्रांती दिनानिमित्त पाणीपोई सुरू..
![]()

अमळनेरला क्रांती दिनानिमित्त पाणीपोई केली सुरू..
अमळनेर प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्यावर पाण्यासाठी संघर्ष केला. आणि इथल्या बहुजनांसाठी चवदार तळे खुले केले. या क्रांती दिनाचे औचित्य साधून शहरातील प्रबुद्ध कॉलनीच्या रहिवासी नगरसेविका सौ. सविता योगराज संदानशिव व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते योगराज संदानशिव यांनी प्रबुद्ध विहाराच्या मुख्य चौकात पाणीपोई सुरू केली.
याप्रसंगी भन्ते संघरक्षित, रवींद्र बाजीराव सोनवणे, प्रकाश सोनवणे ,प्राधापक दिनेश बोरसे, महेश कासार, दिपक चौगुले यासह नागरिक आदी उपस्थित होते.

