1 min read

भूषण महाजन यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

Loading

भूषण महाजन यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

प्रसंगी राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्काराने देखील सन्मानित..

जळगाव प्रतिनिधी – पुणे पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले.
प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी पाळधी येथील पत्रकार भूषण महाजन यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली निवड पत्र हे राज्याध्यक्ष वसंतमुंडे यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रसंगी मान्यवरांचा हस्ते उत्कृष्ट संघटक पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले.

सन 2016 – 17 पासून संघटनेने दिलेल्या प्रत्येक जबाबदारी यशस्वी त्या पार पाडल्याने त्यांची संघटनात्मक बांधणी पाहून तसेच यापूर्वी त्यांनी 2017 ते 2021 असे चार वर्षांपर्यंत संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष या पदावर काम केले.
तसेच 2021 ते आतापर्यंत ते खानदेश विभागीय उपाध्यक्ष या पदावर काम करत होते या सर्व गोष्टींची दखल घेत त्यांची जिल्हाध्यक्ष (प्रिंट मीडिया विभाग) या पदावर नियुक्ती करण्यात आले असून नियुक्ती पत्रावर राज्याध्यक्ष वसंतरावजी मुंडे, राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, तसेच खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या सह्या आहेत.
निवडीचे व पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *