1 min read

प्रताप महाविद्यालयातील चार विद्यार्थिनींची शिक्षकपदी निवड

Loading

प्रताप महाविद्यालयातील चार विद्यार्थिनींची शिक्षकपदी निवड

अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय येथे नुकत्याच झालेल्या प्लेसमेंट सेल आयोजित भरती मेळाव्यात स्वामी विवेकानंद विद्यापीठ, अलिराजपूर (मध्यप्रदेश) या शाळेने हा शिक्षक भरतीचा उपक्रम राबविला. ही भरती शिक्षक या पदासाठी असून तृतीय वर्ष व पदव्युत्तर वर्षातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदविला. या भरतीसाठी स्वामी विवेकानंद विद्यापीठ येथील प्राचार्य समीर कुलकर्णी, उपप्राचार्य प्रार्थना शर्मा व प्रा. दिनेश चव्हाण यांनी प्रात्यक्षिक मुलाखत घेऊन निवड प्रकिया पूर्ण केली. या भरती मेळाव्यात चार विद्यार्थिनींची निवड झाली. त्यात काजल विष्णू देवरे, धनगर मयुरी भास्कर, राजश्री ज्ञानेश्वर देशमुख व ज्योत्सना भगवान पाटील या निवड झालेल्या विद्यार्थिनीचे खा.शि.मंडळाचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी व चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन, सरचिटणीस डॉ. धीरज वैष्णव (अधिसभा सदस्य), उपप्राचार्य डॉ. जी.एच.निकुंभ, प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा.डॉ.जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. वैजय मांटे, आयक्युएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, यांनी अभिनंदन व कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशासाठी समन्वयक प्रा. डॉ. तुषार रजाळे, प्रा. डॉ. संदीप नेरकर (अधिसभा सदस्य), प्रा. संतोष दिपके, डॉ.वृषाली वाकडे, प्रा. वैशाली राठोड, प्रा. किरण सूर्यवंशी, प्रा. पुष्पा पाटील, डॉ.वंदना भामरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *