1 min read

शिक्षकांच्या पेहराव,संच मान्यता निकष व विषयांबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा

Loading

शिक्षकांच्या पेहराव,संच मान्यता निकष व विषयांबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा

मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या पेहराव्या संदर्भात 15 मार्च 2024 रोजी शासनाकडून आदेश निघाला होता, सदर आदेशामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते, म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जेके पाटील यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर निवेदन दिले होते, तसेच आज मंत्रालयात जाऊन शिक्षण मंत्री यांचे ओ एस डी मंगेश शिंदे व उपसचिव तुषार महाजन यांची भेट घेऊन सदर आदेशातील निकषांवर चर्चा केली.
सविस्तर चर्चेतून असा निष्कर्ष काढण्यात आला की शिक्षकांनी
शाळेत जीन्स पॅन्ट व टी-शर्ट घालू नये
महिलांनी साडी व दुपट्टा असलेला सलवार कुर्ता घालावा
पुरुष शिक्षकांनी गडद रंगाची पॅन्ट व फिकट रंगाचा शर्ट घालावा
विद्यार्थ्यांसमोर शोभनीय ड्रेस असावा अशी धारणा शासनाची आहे
ड्रेसचा रंग ठरवण्याची जबाबदारी शाळेवर दिली होती, सदर अट शिथिल करून एकाच रंगाचा ड्रेस बंधनकारक नसावा अशी ही मागणी केली
तसेच संच मान्यतेच्या नवीन निकषासंदर्भात माध्यमिक शाळेतील 100 विद्यार्थी संख्या मागे 1 मुख्याध्यापक पूर्वीप्रमाणेच मिळावा, सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच शाळेत सेवा संरक्षण मिळावे, अतिरिक्त झाल्यास मुख्याध्यापकास शिक्षक करू नये, दुर्गम भागातील कमीत कमी पटसंख्या 10 ते 15 , शहरी भागाची 20 असावी , कला क्रीडा शिक्षकांच्या पदांबाबत, अंशतः अनुदानित शाळेतील अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकास आर्थिक वर्षात टप्पा वाढ मिळावा, तसेच सेवा जेष्ठतेच्या संदर्भात चर्चा केली आहे,
संच मान्यता व सेवा संरक्षणाच्या कोणत्या दुरुस्त्या व्हाव्यात याकरता स्वतंत्र पत्र आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर व मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे
तसेच जुनी पेन्शन, वाढीव टप्पा अनुदान, शेवटच्या वर्गाची पटसंख्या, त्रुटी पूर्तता केल्या शाळांचे अनुदान, अघोषित शाळांचे अनुदान, अर्धवेळ शिक्षकांचे उन्नयन करणे, जुनिअर कॉलेज आयटी शिक्षक अनुदान, इत्यादी विषयांवर चर्चा झाली असून आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या दालनात यावर एक बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडवले जाणार आहे
सोबत आर.डी.निकम, सचिन नलवडे, संजय पाटील, विजय येवले, देसाई, रहाटे काका उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *