1 min read

स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या क्रांती पाटील व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या समाधान पाटील यांच्या यशाची भरारी

Loading

स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या क्रांती पाटील व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या समाधान पाटील यांची यशाची भरारी

खेडी प्रगणे जळोद येथे विविध क्षेत्रा त यश संपादन करणाऱ्यांचा झाला सन्मान सोहळा

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- जिद्द चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाळगली तर आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरू शकतो. असेच स्वप्न उराशी बाळगून जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर एका ग्रामीण भागातील क्रांती पाटील ने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून व समाधान पाटील यांनी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपली स्वप्न सत्यात उतरवले आहे त्यांचा नुकताच सन्मान सोहळा संपन्न झाला. व त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
सविस्तर माहिती अशी कि प्रा. श्याम पवार यांच्या संकल्पनेतून आयोजित या सत्कार सोहळ्याला सत्कारमूर्ती म्हणून आपल्या अमळगाव परिसरातील ताईसो. क्रांती सुरेश पाटील यांची एमपीएससी मार्फत पीडब्ल्यूडी विभागात उपअभियंता पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच दुसरे सत्कारमूर्ती दादासो. समाधान नरेंद्र पाटील यांची पवित्र पोर्टल मार्फत जि प .शिक्षक म्हणून रत्नागिरी येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन स्व. नानासो साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालय खेडी प्र.ज. यांच्या मार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवल भाऊ औद्योगिक प्रशिक्षण येथील प्राचार्य किरण बाविस्कर सर होते. तर अध्यक्ष म्हणून गावातील माजी मुख्याध्यापक टी पी पवार हे होते. यावेळी सत्कारमूर्तींचा स्टेजवरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले आपले मनोगत व्यक्त करताना क्रांती पाटील यांनी सांगितले की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने एक ध्येय निश्चित केले पाहिजे असे सांगितले तर दुसरे सत्कारमूर्ती समाधान पाटील यांनी सतत अभ्यास व चिकटी प्रत्येकाने आपल्या अंगाशी बाळगली पाहिजे हे सांगितले. प्रमुख पाहुण्यांमध्ये मनोगत व्यक्त करीत असताना बाविस्कर सर यांनी खाली बसलेल्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं की तुम्ही सुद्धा एक दिवस तुमच्या आई-वडिलांना या स्टेजवर बसण्याची संधी तुम्ही उपलब्ध करुन देऊ शकतात असे विद्यार्थ्यांना अधोरेखित केले तर आपल्या अध्यक्ष भाषण्यात टीपी पाटील सर यांनी वाचनालयाचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमात विलास दादा शिंदे, एम एस पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला गावातील सामाजिक,राजकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सगळे जेष्ठ मंडळी उपस्थित होती.
मा. सर्व ग्रा.प. सदस्य व मा.चेरमन, संचालक वि.का.स. सोसायटी (अमळगाव) खेडी प्र.ज. व समस्त ग्रामस्थ खेडी प्र.ज. हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.शाम पवार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कैलास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. जिजाबराव पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *