1 min read

अमळनेर तालुका भडगांव आर.टी.ओ. ऑफीसला न जोडता पुर्ववत जळगांव येथेच सुरू ठेवा

Loading

अमळनेर तालुका भडगांव आर.टी.ओ. ऑफीसला न जोडता पुर्ववत जळगांव येथेच सुरू ठेवा

अमळनेरला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकां-ना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुका भडगांव आर.टी.ओ. ऑफीसला न जोडता पुर्ववत जळगांव येथेच सुरु राहू द्यावे अशी मागणी अमळनेर येथे शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख अनंत निकम यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे..
अमळनेर तालुका हा पुर्वीपासूनच जळगांव जिल्हा असल्या कारणाने आर.टी.ओ. साठी सुरु होते. पण शासनाने जिल्हात भडगांव येथे नविन विभागीय आर.टी.ओ. ऑफीस निर्माण केल्याने अमळनेर हे भडगांव तालुक्यातील आर.टी.ओ. ऑफीसला जोडण्यात आलेले आहे. पण अमळनेर तालुक्यातील नागरीकांची गैरसोय होणार आहे. कारण भडगांव येथे जाण्या-येण्यासाठी पाहिजे तशी सुविधा नाही. तसेच जळगांव हे जिल्हयाचे ठिकाण असून सर्वसामान्य लोकांचे इतर कामे देखील एकाच दिवशी एकाच ठिकाणी करु शकतात. तसेच
SDO जाण्या-येण्यास रेल्वे, बस व इतर सुविधा मुबलक असल्याने जळगांव हे गैर सोईचे होत नाही.
नविन वाहन जळगांव येथील शो रुम मध्ये घ्यावे लागेल व त्याला पासिंगसाठी भडगांव येथे घेवून जावे लागेल. तद्नंतर नागरीकांना अमळनेरला यावे लागेल. यामुळे नागरीकांचे आर्थीक तसेच वेळेचे, व मानसिक- त्रास सहन करावा लागणार म्हणुन यासाठी अमळनेर तालुका हा पुर्ववत जळगांव आर. टी. ओ. जोडण्यात यावे ही नम्र विनंती. अन्यथा आम्हांला नाईलाजास्तव तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील, उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख अनंत निकम, दुर्गेश पवार सचिन वाघ,महेश ठाकरे, किशोर पाटील नारायण पाटील, नाना पाटील ,नरेंद्र पाटील, कैलास पाटील, शालिक साळुंखे, सुशील सोनार ,प्रकाश पाटील, संभाजी पाटील,मदन पाटील, अनिल पाटील, गोपाल वानखेडे, विपुल महाजन सुभाष पाटील ललित पाटील धनराज पाटील कैलास कांबळे प्रदीप सूर्यवंशी यांच्या निवेदनावर सह्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *