1 min read

नक्षत्र क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे MTS परीक्षेत गुणवत्ता यादीत

Loading

दिनांक 28 जानेवारी 2024 रविवार रोजी झालेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च MTS परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात नक्षत्र क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत घवघवीत यश संपादन केले. नक्षत्र क्लासेसची विद्यार्थिनी आरुषी लहूसिंग पाटील इयत्ता तिसरीतून केंद्रात पहिली तर कृष्णा विजय पाटील केंद्रात तिसरा व रुद्र अतुल पाटील केंद्रात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे.तसेच प्रेरणा गुणवंत देसले इयत्ता चौथीतून केंद्रात पहिली तर आरोहण विकास कोतकर चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. इयत्ता सहावी ची प्रांजल लहूसिंग पाटील ही विद्यार्थिनी देखील भडगाव केंद्रातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. गुणवत्ता यादीत झळकल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. नक्षत्र क्लासेसच्या संचालिका कुमारी पूजा अवधूत कासार यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनापासून अभिनंदन केले. व पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *