मुख्याधिकारी यांची विद्येश्वर महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला भेट देत वॉल कंपाऊंड तसेच पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाची केली पाहणी
![]()



अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शहरातील अत्यंत सुंदर व जागृत विद्येश्वर महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला नुकतीच मुख्याधिकारी यांनी भेट दिली…
प्रभाग क्रं 14 विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड तसेच पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाची पाहणी साठी आलेल्या अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.तुषार नेरकर तसेच अभियंता अमोल भामरे, डिगंबर वाघ यांचा विद्येश्वर महादेव मंदिरातर्फे सत्कार करतांना युवा सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील सोबत प्रा.डि.आर.जगताप,देसाई बापू, नरेंद्र पाटील, शिवनारायण पाटील, संजय पाटील, सुनिल शिंगाणे, प्रविण गुजर, प्रविण वाघ उपस्थित होते.

