1 min read

धानोरा येथे मौर्य क्रांती संघाचे फलक अनावरण

Loading

धानोरा येथे मौर्य क्रांती संघाचे फलक अनावरण

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील धानोरा येथे मौर्यक्रांती संघाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .तसेच मौर्यक्रांती संघटनेच्या फलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष रवींद्र लाडगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा साहेब बन्सीलाल भागवत हे होते. प्रास्ताविक एस. सी. तेले सर यांनी केले. यावेळी धनगर समाजाला मार्गदर्शन करताना अण्णासाहेब बन्सीलाल भागवत म्हणाले शिक्षण, उद्योग व संघटन मुळे समाजाची प्रगती होऊ शकते .समाजाने इतर समाजालाही अहिल्यादेवी प्रमाणे कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी रवींद्र लाळगे ,गोपीचंद शिरसाट, आर .सी भालेराव ,डी एस धनगर सरयांनी मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निंबा कंखरे, पप्पू कंखरे ,गुलाबराव भागवत, निलेश बागुल ,दिलीप ठाकरे ,नरेश नहाळदे, हिम्मत ठाकरे,शालिग्राम ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी साठी शाखा प्रमुख शांताराम ठाकरे ,तुषार ठाकरे, योगराज ठाकरे, अमृत रत्नपारखे , गोपीचंद ठाकरे ,निलेश ठाकरे,शंकर ठाकरे, प्रशांत ठाकरे ,छबिलाल ठाकरे ,पितांबर ठाकरे, यांनी केले. या कार्यक्रमाला समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एस.सी .तेले सर व आभार प्रदर्शन वसंत शिरसाट यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *