1 min read

उदया साने गुरुजी वाचनालयात  मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष डिगंबर महाले यांचा होणार सन्मान

Loading

अमळनेर प्रतिनिधी- मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचा शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रासाठी नेहमीच मदतीचा हात असतो.. असाच मदतीचा हात त्यांनी साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी भले मोठे डिजिटल स्क्रीन सप्रेम भेट दिले आहे. त्यांच्या ह्या दातृत्वाचा सन्मान आज होणाऱ्या पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात महिला दिनाचे औचित्य साधत आज ७ मार्च २०२४ ला साने गुरुजी वाचनालयात येथील जुना टाऊन हाँलमध्ये संध्याकाळी ६ वाजता परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ या अरुण कोल्हटकर यांच्या कविता संग्रहातील निवडक कविता जिवंत करून थक्क करणारा प्रयोग ठेवण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान केला जाणार आहे..
श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थान अमळनेर यांनी पू साने गुरुजी ग्रंथालय संचालित पू साने गुरुजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास विद्यार्थी विद्यार्थिनी यांना अद्यावत शिक्षण मिळावे या साठी भले मोठे डिजिटल स्क्रीन सप्रेम भेट दिली
या डिजिटल स्क्रीन चे उद्घाटन शंभू पाटील ज्येष्ठ रंगकर्मी परिवर्तन जळगाव यांच्या हस्ते होणार आहे
या प्रसंगी श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांच्या या भरघोस देणगीतून हे साकार झाले म्हणून सरांचे आभार अन कौतुक सोहळा होणार आहे वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व चिटणीस प्रकाश वाघ व संचालक मंडळ यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *