यश महाजन व भावना महाजन यांनीभव्य खान्देश ग्लोबल फेस्टिवलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले पोट्रेट पेंटिंग
![]()

यश महाजन व भावना महाजन यांनी
भव्य खानदेश ग्लोबल फेस्टिवलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना दिली
पोट्रेट पेंटिंग
अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे ता.अमळनेर येथील रहीवाशी व नोकरीनिमित्त कल्याण येथे कार्यरत यश महाजन यांच्या कला विषयातील विशेष पुरस्कार व कलेमुळे सर्वत्र अभिनंदन होत असते..
श्री.यश मधुकर महाजन कलाशिक्षक श्री. वानी विद्याशाला हायस्कूल कल्याण पश्चिम. व सौ भावना यश महाजन कला शिक्षिका श्री मोहनलाल डेडिया इंग्लिश हायस्कूल शहाड कल्याण पश्चिम
कल्याण येथे खानदेश विकास मंडळ तर्फे भव्य खानदेश ग्लोबल फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्य कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील व खासदार श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते त्या प्रसंगी मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना त्यांचे पोट्रेट पेंटिंग त्यांच्या वाढदिवसानिमित्त तयार केलेली होती परंतु तेव्हा काही कारणास्तव देता आलली नाही म्हणून या महोत्सवात भेट दिली..तेव्हा कलाभूषण कळमसरे येथील रहीवाशी यश महाजन व पत्नी भावना महाजन यांच्या कलेचे मित्र परीवार यांच्या वतीने सर्वत्र अभिनंदन होत आहे..

