1 min read

अमळनेरला प्रतापियन्स प्रेरणा प्रबोधिनी नूतन कार्यकारणी घोषित

Loading

अमळनेरला प्रतापियन्स प्रेरणा प्रबोधिनी नूतन कार्यकारणी घोषित

अध्यक्षपदी प्रा डॉ एस ओ माळी, चिटणीसपदी दिलीप शिरसाठ

अमळनेर- प्रतापियन्स माजी विद्यार्थी- माजी शिक्षक संघटना संचलित प्रतापियन्स प्रेरणा प्रबोधिनीची नूतन कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली. यात अध्यक्षपदी प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा डॉ एस ओ माळी व चिटणीसपदी दिलीप शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड 2023- 24 ते 2028- 29 या वर्षासाठी करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणी अशी उपाध्यक्षपदी प्रकाश लांडगे, खजिनदारपदी स्वर्णदीप राजपूत तर संचालक पदी उमेश काटे, डी ए धनगर, विजयसिंह पवार, संदीप शिरोडे, प्रवीण बडगुजर, प्रा कल्पना पाटील, जागृती माळी तर आमंत्रित सदस्य म्हणून प्रा नारायण खोडके, चंदुलाल बडगुजर व प्रा डॉ श्याम साळुंखे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. दरम्यान नूतन अध्यक्ष प्रा डॉ एस ओ माळी यांनी सांगितले की, प्रताप महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांना संघटित करून एकत्रित लक्षवेधी सांघिक काम करण्याचा मानस आहे. स्पर्धा परीक्षेत तालुक्याचा टक्का वाढावा यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले जातील, यूपीएससी सारख्या परीक्षेत उच्च अधिकारी होण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल तसेच प्लॅन बी म्हणून या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राकडे नेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *