समाजवादी ऐक्याचा ठराव – अतुल देशमुख
![]()



समाजवादी ऐक्याचा ठराव – अतुल देशमुख
देशातील सद्य स्थिती ही अत्यंत वाईट आहे. लोकशाही धोक्यात आहे. सांविधानिक यंत्रणा दबावाखाली आहेत. नथुरामी फॅसिझम वाढत आहे. आंदोलनं दडपली जात आहेत. बेरोजगारीने आपला उच्चांक गाठला आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. महागाईने कंबरडे मोडले आहे. शेतकरी – शेतमजुरांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. दाद मागायला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे पेरले जात आहे.
अकलियत डर के माहौल में जी रहे है ।
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद आहेत. नोकर भरतीच्या खाजगी यंत्रणेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात आणि कंत्राटीकरणात वाढ केली जात आहे. आर्थिक विषमता वेगाने वाढत आहे. भटक्या विमुक्तांचे दैन्य संपलेलं नाही. जातीजातींमध्ये भांडणं लावली जात आहेत. धार्मिक भेदभाव वाढवले जात आहेत.
अशा परिस्थितीमध्ये लोकशाही समाजवादी परिवारातील आम्ही सर्वजण एकत्र येऊन विकल्प उभा करण्याचा संकल्प करत आहोत. भारतीय संविधानावर आलेलं संकट यशस्वीपणे परतवून लावण्याचा निर्धार आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सभेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.
त्यासोबतच महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचे असेल तर सर्व वंचित बहुजन, शेतकरी, कामगार आणि अन्य कष्टकरी घटकांना सोबत घेऊन मजबूत आघाडी उभी केली पाहिजे.
लोकशाहीवर आलेला हुकूमशाहीचा वरवंटा रोखण्यासाठी देशातील इंडिया आघाडीला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला समर्थन देण्याचे आवाहन ही सभा करत आहे.

