1 min read

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर तर्फे कॉम. उमरावमल पुरोहित यांच्या जयंती निमित्ताने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन..

Loading

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर तर्फे कॉम. उमरावमल पुरोहित यांच्या जयंती निमित्ताने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन..

अमळनेर प्रतिनिधी
वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन यांच्या वतीने दिनांक 01 मार्च रोजी हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत प्रथम वरणगाव विरुद्ध चोपडा चुरस रंगली यात वरणगाव संघाने बाजी मारली.दुसऱ्या फेरीत चोपडा विरुद्ध अमळनेर या दोन्ही संघांमध्ये चुरस रंगली त्यात अमळनेर विजय होऊन अंतिम फेरीत वरणगाव वर्सेस अमळनेर यात अटीतटीचा मुकाबला झाला.यात अमळनेर या संघाने मोठ्या फरकाने विजय मिळविला.
अमळनेर संघाच्या वतीने कॅप्टन जगदीश सोनवणे उप कॅप्टन राजेश राठोड रजनीश कुमार,चंद्रकांत सोनवणे,उमर आलम विकास शिरसाट,महेश पवार,विजेंद्र पंजरिया,अभिषेक कुमार,स्वप्निल कुलभूषण चौहान, संजीव कुमार या खेळाडूंनी चांगलं कौशल्य दाखवीत विजय संपादन केले.
याप्रसंगी श्री गुप्ता जी यांच्या हस्ते विजयी संघाला वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शाखा सचिव श्री प्रविण काळे,शाखा अध्यक्ष श्री मनीष भावसार,शाखा पदाधिकारी श्री अशोक कोळी,श्री दिनकर बोरसे,श्री संदीप सोनार,श्री चंद्रकांत सोनवणे,चैतन्य सोनवणे इत्यादी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *