1 min read

22 फेब्रुवारी चिंतन दिवसWORLD THINKING DAY

Loading

22 फेब्रुवारी चिंतन दिवस
WORLD THINKING DAY

22 फेब्रुवारी रॉबर्ट बेडेन पॉवेल व लेडी बेडेन यांचा जन्म दिवस

रोबर्ट बेडेन पॉवेल यां चा जन्म दिवस दरवर्षी जागतिक विचार दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक विचार दिनासाठी नवीन थीम ठरवली जाते. जगभरातील लोक वर्षाच्या थीमवर आधारित कार्यक्रम आखतात. हा दिवस कसा अस्तित्वात आला हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जागतिक विचार दिन महिला आणि समाजातील त्यांच्या हक्कावर केंद्रित आहे. त्यानुसार थीमही ठरवल्या जातात.
2024 मध्ये जागतिक विचार दिन ही
॑ आमचे जग , आमचे समृध्द भविष्य ॑ थीम स्वीकारेल.
या थीमचा उद्देश स्त्रिया आणि मुलींना हवामान बदलामुळे त्यांचा कसा परिणाम होतो आणि याचा परिणामाचा सामना करण्यासाठी त्यांनी केलेल्या कृतींबद्दल विचार करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.
महिलांच्या समस्या बाबत व्यक्त होण्यासाठी जागतिक विचार दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण जगभरात गेल्या 90 वर्षांपासून साजरा केला जात आहे. असा हा एक दिवस आहे जो मैत्री आणि सशक्ती करणासाठी साजरा केला जातो.
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, जगभरातील गर्ल स्काउट्स आणि गर्ल गाईड , या दिवशी मुली आणि तरुणींवर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करतात.

जागतिक विचार दिनाचा इतिहास ॱ……
पहिला जागतिक विचार दिन 1928 मध्ये लॉर्ड रॉबर्ट बॅडेन पॉवेल यांचा वाढ दिवस आणि स्काऊटिंग चळवळीची स्थापना करणाऱ्या पॉवेल यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आला .स्काउट्सना त्यांच्या प्रतिज्ञेचे महत्त्व आणि त्यांच्या चळवळीच्या जागतिक व्याप्तीवर प्रतिबिंबित करण्याची परवानगी देणे हा उद्देश आहे. 1932मध्ये जागतिक विचार दिनाच्या उत्सवात सर्व तरुणांचा समावेश करण्यात आला.
जागतिक विचार दिन हा आंतरराष्ट्रीय मैत्रीचा दिवस आहे. जगभरातील मुलींचे जीवन सुधारू शकतील अशा कारणांसाठी समर्थन करण्याची वेळ आहे.
रॉबर्ट बेडन पॉवेल – स्काऊटिंग संस्थापक
यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857. रोजी लंडन येथे झाला. जगभर पसरलेल्या बालवीर (स्काऊट व गाईड) संघटनेचे जनक. संपूर्ण नाव रॉबर्ट स्टिफ न्नसन स्मिथ बेडन पॉवेल . वडील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. आई इंग्लंडचे दर्या सारंग ड ब्लू टी स्मिथ यांची मुलगी. बेडन पॉवेल तीन वर्ष वयाचे असताना च वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आईनेच त्यांचा सांभाळ केला. लंडन मधील चार्टर हाऊस या शाळेत शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांना 1876 मध्ये लष्करात कमिशनर झाले. भारत, अफगनिस्थान, द. आफ्रिका अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावली . त्यापैकी दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धात मॅफकिंग हया शहराची शत्रूच्या वेढयापासून केलेली मुक्तता ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी होय. मेजर म्हणून बढती मिळाली.
सैनिकी स्काऊट करीता त्यांनी लिहिलेले एड्सटू स्काऊटिंग हे पुस्तक शाळेतील मुलांसाठीही अतिशय उपयुक्त असल्याचे लक्षात येताच , त्यांनी इंग्लंडच्या ब्राऊन्सी बेटावर मुलांचे पहिले स्काऊट शिक्षण शिबीर भरविले. व अशा प्रकारे बालवीर संघटनेची चळवळ सुरू केली. थोड्याच दिवसात ही चळवळ अनेक देशात पसरली. 1910 मध्ये मुलींसाठी ॑ वीरबाला ॑
( गर्ल गाईड) ही संघटना स्थापन केली. मुलांना व मुलींना जगाचे आदर्श नागरिक बनविणे हा या दोन्ही संघटना मागील हेतू होता. पुढील संपूर्ण आयुष्य त्यांनी बालवीर संघटनेसाठी वाहून घेतले. 1912 मध्ये ओलेव्ह सोम्स यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लेडी बेडन पॉवेल यांनी विरबाला या संघटनेची जबाबदारी स्वीकारली. विरबाला संघटनाची पथके बेल्जियम , हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया, हवाई बेटे इ. राष्ट्रामध्ये सुरू झाली. जगभर पसरलेल्या ह्या संघटनांची पाहणी करण्यासाठी बेडन पॉवेल व त्यांच्या पत्नी यांनी सर्व राष्ट्रांना वेळोवेळी भेटी दिल्या. भारतास ह्या दोघांनी 1921 व 1937 मध्ये भेट दिली.
लंडन येथे 1920 मध्ये भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्काऊट मेळाव्यात (जांबोरीच्या) वेळी ” जगाचे प्रमुख स्काऊट ” (चिफ स्काऊट) हा बहुमान त्यांना सर्वानुमते मिळाला.1922 मध्ये बरोनेट व 1929 मध्ये फर्स्ट बॅरन बेडन पॉवेल ऑफ गीलवेल (गिलवेल हे अमेरिका मधील बालवीर शिक्षणाचे जागतिक केंद्र आहे) होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल 1939 मध्ये त्यांचे नाव शांततेच्या नोबेल पारितोषिकसाठी सुचविले होते, परंतु दुसऱ्या जागतिक युद्धामुळे ते दिले गेले नाही.
बेडन पॉवेल यांनी आपल्या आईला लिहिलेली 2000 हून अधिक पत्रे अतिशय महत्वाची आहेत. त्यांची काही चित्रे व कलाकृती इंग्लंड मध्ये “गीलवेल पार्क” ह्या शिक्षण केंद्रात जतन केलेल्या आहेत. 8 जानेवारी 1941 मध्ये केनिया मधील न्येरी येथे त्यांचे निधन झाले. बेडन पॉवेल यांची उल्लेखनीय पुस्तके पुढील प्रमाणे –
स्काऊटिंग फॉर बॉयीज 1908, माय ॲडव्हेंचरस ॲज अ स्पाय 1915, गर्ल गाईडिंग 1917, व्हॉट स्काउट्स क्यान डू 1921, स्काऊटिंग अँड युथ मुव्हमेंटस 1929, लेसेंस अ लाईफ टाईम आत्मचरित्र 1933, आफ्रिकन ॲडव्हेंचरस 1936, पॅडल युवर ओन कंगो 1939,
लॉर्ड बेडन पॉवेल यांना भावपूर्ण आदरांजली 🌷👏🌷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *