1 min read

शिक्षकांनो निवडणुकीच्या कामावर जाऊ नका !राज ठाकरे यांचा आदेश

Loading

शिक्षकांनो निवडणुकीच्या कामावर जाऊ नका !
राज ठाकरे यांचा आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

मुंबईतील शारदाश्रम शाळेतील मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आल्यानंतर शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासाविना राहणार आहेत.शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या पालकांनी आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनाध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची व्यथा व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला. निवडणूक होणार याची कल्पना निवडणूक आयोगास नाही का? निवडणूकीसाठी पर्यायी कर्मचारी व्यवस्था निर्माण करावी. शिक्षकांना निवडणूक कामासाठी जुपणे अयोग्य आहे. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मुंबईतील शिक्षकांनी निवडणूक कामावर रुजू होण्यास नकार द्यावा अशा सुचना राज ठाकरे यांनी शिक्षकांना दिल्या आहेत.
राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या कामासाठी पर्यायी कर्मचारी व्यवस्था उभारण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडे केले आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. शाळेच्या शिक्षकांना नोटीस दिली आहे. त्या संदर्भात त्यांनी शिक्षकांना शाळेत जाण्यासाठी व निवडणूक कामावर रुजू होऊ नये असे आदेश दिले आहेत. आता शिक्षक राज ठाकरे यांच्या आदेशानुसार काय करतात? या कडे पालकवर्गासह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *