1 min read

संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी

Loading

संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शासकीय विश्रामगृहात उत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल जाधव व अध्यक्ष किरण जाधव प्रसिद्धी प्रमुख राजेश राठोड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. डिजेच्या तालावर नाचत स्टेशन रोड, आठवडे बाजार, पाचपावली, बस स्टैंड मार्गे भव्य शोभायात्रा काढण्यात येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व बंजारा समाज बांधव परिवारासह तसेच महिला पारंपारिक वेशात या शोभायात्रेत सहभागी झाले होते. मिरवणुकीसाठी एकनाथ जाधव,चंदू जाधव, राहुल चव्हाण, रणजीत राठोड, राजेश राठोड, राम पवार , प्रकाश पवार ,किशोर पवार, नरेंद्र राठोड, ज्ञानेश्वर राठोड, संदीप पवार, विनोद जाधव, ईश्वर राठोड, सुभाष चव्हाण, प्रकाश राठोड इत्यादी सह हजारो बंजारा समाजातील लोक उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यात्रेचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *