1 min read

साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे सभासद श्री माऊली जय गजानन पॅनललाच विजय करतील..।

Loading

साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे सभासद श्री माऊली जय गजानन पॅनललाच विजय करतील..।

हिंदी अध्यापक मंडळाचे आशिष शिंदे यांनी केला विश्वास व्यक्त…

जाहिरात….

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतसंस्था मर्यादित अमळनेर ची पंचवार्षिक निवडणूक 18 फेब्रुवारीला सकाळी आठ ते चार वाजेच्या दरम्यान मतदान होणार आहे .श्री माऊली जय गजानन पॅनल चा प्रचार नियोजनबद्ध झाला .पॅनल प्रमुख व माजी साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष व निवडणुकीतील उमेदवार राजेंद्र पाटील, पतपेढीचे अध्यक्ष सचिन साळुंखे व ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पार पडला.
श्री माऊली जय गजानन पॅनलच्या सर्व उमेदवारांना सभासद सेवेची संधी देतील.. माऊली जय गजानन पॅनलचाच विजय होईल असा विश्वास हिंदी अध्यापक मंडळाचे तालुका अध्यक्ष आशिष शिंदे यांनी मराठी लाईव्ह शी बोलतांना सांगितले..
ते पुढे म्हणाले की श्री माऊली जय गजानन पॅनल निवडून आल्यानंतर सभासदांच्या हितालाच नेहमीच प्राधान्य देईल. पतसंस्थेची विकासाची भरभराट संस्थेचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष शांतारामबापू पाटील, आबासाहेब व्ही एन देसाई, प्राध्यापक आर.बी पवार यांनी ज्या पद्धतीने राखली त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून श्री माऊली जय गजानन पॅनल चे सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर काम करतील हा आशावाद त्यांनी व्यक्त करत अमळनेर तालुक्यातील सर्व सुज्ञ सभासद बंधूंना भगिनींना आव्हान आहे की कपबशी या चिन्हावर शिक्का मारून सर्व पॅनलच्या उमेदवारांना सेवेची संधी द्यावी असे त्यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *